६० किलोचा ‘केक’ कापला ; शेकडो कार्यकर्त्यांचा रा.कॉ.पा मध्ये प्रवेश
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्त स्थानीय पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा येथे ६० व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ६० किलो वजनाचा केक कापून साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने कारंजा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली रा.कॉ.पा मध्ये जाहीर प्रवेश केला.
रा.कॉ.पा नेते हाजी मो. युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित वाढदिवस कार्यक्रमात प्रदेश सचिव बाबारावजी खडसे,कारंजा न.प माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक सोनालीताई ठाकूर, यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर, वाशिम जि.प. माजी सभापती हेमेन्द्र ठाकरे, प्रदेश चिटणीस सुधाकर गर्जे, हाजी सरफराज खान, बाबा खान, एम.टी. खान,जुम्मा पप्पुवाले, अड मिलिंद खंडारे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, लिलासेठ पंजवणी,नसरुल्ला खान, नितीन गढवाले, प्रसन्ना पळसकर आदी प्रमुख अतिथी म्हणून मंचकावर उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून कारंजा नगरपालिका सदस्य,मानोरा नगरपंचायत नवनिर्वाचित सदस्य तथा मंगरूळपीर नगरपालिका सदस्य सह राकॉपा आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भव्य आतिषबाजी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवर सोनाली ठाकूर,बाबारावजी खडसे, दत्तराज डहाके,हेमेन्द्र ठाकरे व सुधाकर गर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात मो.युसुफ पुंजानी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्व विशद करीत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकहाती सत्ता प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
