Post Views: 692
विविध मान्यवर कीर्तनकाराचे होणार रोज कीर्तन
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापुर तालुक्यातील शिवर येथील संत गजानन महाराज व ब्रिजभूषण महाराज इतिहासिक भेट संस्थान शिवर येथे वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याप्रसंगी संत गजानन महाराज व ब्रिजभूषण महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून समर्थनाचे पावलं शिवर या ठिकाणी लाभले, जंगलात सुद्धा यात्रा सुरू झाली या ठिकाणी सर्व समाजाचे वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येतात असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प राम महाराज गव्हारे यांनी केले, ते गजानन महाराज शिवर येथे बोलत होते.
किर्तनाला सोशल डिस्टन मास्क वापरून लोक उपस्थित होते, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साप्ताहिक कीर्तनाची सुरुवात दि.१३ फेब्रुवारी २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२२ वेळ ७ ते ९ पर्यंत असणार आहे, साप्ताहिक कीर्तनाची सुरुवात रविवार ह.भ.प. विष्णु महाराज गावंडे खोडगांव, सोमवार ह.भ. प. वैभव महाराज तराळ सामदा , मंगळवार ह.भ.प. शिवाजी महाराज मानकर भुईखेड,बुधवार ह. भ. प. श्रीधर महाराज पातोंड वरुड जऊळका, गुरुवार ह. भ. प. सागर महाराज परिहार दर्यापूर, शुक्रवार ह. भ. प. सुरज महाराज पोहेकर नरदोडा , शनिवार मोहन महाराज मितकर जैनपूर, असे असून काल्याचे किर्तन रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ वेळ सकाळी सकाळी ११ वा. ह. भ. प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज वाल्मिकी मठ संस्थान सामदा यांच्या हस्ते वार्षिक यात्रा महोत्सववाची सांगता होईल.