वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार शिवारातील शेंदुरजना मोरे रोड़वरील विहिरित अंदाजे आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची घटना दि. १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी उघडकीस आली.
सदर घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर एपीआय मंजुषा मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलाचे नाव महेश कालापाड (वय अंदाजे आठ वर्षे) असून तो शेंदूरजना मोरे येथील रहिवासी असून शेलूबाजार येथे भाड्याने राहत होता अशी माहिती मिळाली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.वृत्त लिहेपर्यंत अधीक माहीती मिळू शकली नाही.