Post Views: 368
राज्य मागासवर्ग आयोगाचा धिसाडी जमाती बाबत धोरणाचा राज्य कार्यकारणी द्वारे निषेध
दर्यापूर – महेश बुंदे
धीसाडी तेरमा समाजाला लोहार समाजाच्या रांगेत बसून या समाजातील आरक्षण दोन समाजात वाटप करण्याचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा निर्णय अन्यायकारक व आयोगाच्या बुद्धी दिवाळखोरीचे प्रतीक असल्याचे सांगत धिसाडी तेरमा बहुउद्देशीय संघच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ने दर्यापूर मध्ये पत्रकार परिषद घेत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आज दि १४ रोजी महेश्वरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली, यामुळे दोन समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण झाली असून धीसाडी जमात व लोहार समाज एक नसून भिन्न आहेत हे शासनाच्या निर्दशनास आणून देत या कार्यकारिणीने अनेक वेळा राज्य मागासवर्ग आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे असे असतानाही शासन निर्णयात भटक्या जमाती ब चा सूचीमधील क्रमांक ८ वरून काढून त्या ठिकाणी जाणून-बुजून लोहार जातीस बसवले आहे हे अन्यायकारक असल्याचे मत बहुउद्देशीय संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी यावेळी व्यक्त केले सदर महासंघाने महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मागासवर्गीय आयोग व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आदींना याबाबत निवेदने देऊन वरील बाब लक्षात आणून दिली आहे .
भारताचे राष्ट्रपती यांनी सामाजिक न्याय महाराष्ट्र यांना पत्र देऊन धिसाडी जमातीच्या सुचित क्रमांक-8 वरून उचलबांगडी करणे अन्यायकारक असून पुनरावलोकन करावे असे सूचित केले आहे परंतु महाराष्ट्र सरकार सदर बाबीकडे डोळेझाक करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले धीसाडी ही भटकी जात असून लोहार ही जात गाव गाड्यांमधील असून बलुतेदार आहे असे असतानाही या दोन्ही जातींना राज्य मागासवर्गीय आयोगाने एकत्र टाकून धिसाडी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणात विनाकारण वाद निर्माण केला आहे हा अन्याय दूर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचे यावेळी राज्य कार्यकारिणीने दर्यापूर मधे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रपरिषदेला धीसाडी तेर्मा बहुउद्देशीय संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजकुमार सुरवसे सोलापूर ,उपाध्यक्ष हिरामण चव्हाण ,औरंगाबाद, सचिव संजय सोळंके दर्यापूर ,विभागीय अधिकारी अजय चव्हाण सांगली , दीपक साळुंखे , हिरामण पांचाळ , कुलदीप सोळुंके , शिवा पवार ,राजेश साळुंखे ,विक्रम सोळंके, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते , यावेळी नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला तथा दर्यापूर मधील समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.