प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 कोटी जागतिक सुर्य नमस्कार घालण्याचा संकल्प यावर्षी करण्यात आला. या निमित्ताने सुर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन क्रीडा विभाग, शालेय शिक्षण विभाग व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण जिल्हयात यशस्वीरित्या करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ऑफिसर्स क्लब येथे जागतिक सूर्य नमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांना सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उदघाटन प्रसंगी क्रीडा राज्य मार्गदर्शक बालाजी शिरसिकर, वाशिम जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव सुनील देशमुख, बाकलीवाल विद्यालयाचे स्काऊटर, रवी वानखडे, रमेश घुगे, मार्गदर्शक म्हणुन योगतज्ञ दिपा वानखडे, आयुष विभाग तथा जिल्हा महिला अध्यक्ष पतंलजी योग समिती वाशिम ह्या उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने तसेच प्रत्यक्ष जिल्हा प्रशिक्षण केंद्र वाशिम येथील खेळाडु कराटे खेळ प्रकारातील खेळाडु, बाकलीवाल विद्यालयातील स्काऊटस् गाईडस् मोठया संख्येने उपस्थित होते. योग प्रशिक्षक दिपा वानखडे यांनी सुर्यनमस्कार केल्याने शरीरात ऑक्सीजनचा संच व रक्त प्रवाह संतुलीत राहतो. तसेच सुर्यनमस्कार हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शरीर संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे दररोज सुर्यनमस्कार काढावे असे आवाहन त्यांनी केले.
