चाकण पोलीस स्टेशन व सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची साठवुणक करून विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई
चाकण वार्ता :- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०७/०२/२०२२ रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची साठवुणक करून विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत पडवळ वस्ती शेलु ता. खेड जि. पुणे येथे इसम नामे गणेश पडवळ हा त्याचे रहाते घरी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची साठवणुक करून तिची आजुबाजुच्या परिसरात वाहतुक करून विक्री करतो.
अशी पोलीस अंमलदार विजय कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन-तीन दिवसापुर्वी पासुन सापळा रचुन चाकण पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०७/०२/२०२२ रोजी १४.३० वा चे सुमारास छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) ४.०१,१७५/- रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या. २) ४.१०,०००/- रु.कि.ची एक महिंद्रा बोलेरो पिकअप जुवा किमत अं. असा एकुण ८,११,१७५/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
