स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;वाशिम जिल्हयामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई

प्रतिनिधी फुलचंद भगत

गुटख्यासह एकुण १२,९९,७५०/- माल जप्त


वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक सो श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे करणाऱ्या इसमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबुन जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले. मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दिनांक ०६/०२/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या खात्री करुन कायदेशीर कारवाईबाबत आदेशित केले.


दिनांक ०६/०२/२०२२ रोजी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी एक पधक तयार केले सपोनि विजय जाधव यांनी आपले पथकाला शिरपुर येथील बस स्टॅन्ड जवळ बोलाविले शिरपुर शहरातील ओमकार कॉलनी हनुमान मंदिराजवळील गोडाऊन चे मागे मोकळया जागेत एक इसम महाराष्ट्र शासना कडुन प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगधित तंबाखु अवैध्यरित्या साठवणुक करुन चोरटया मार्गाने विक्री करती असल्याचे माहिती वरुन शिरपुर येथील ओमकार कॉलनी हनुमान मंदिराजवळ उभी असलेल्या एका मारुती सुझुकी गाडी क्र एमएच३७ जो १८४३ पाहणी केली असता

गाडीत दोन इसम महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाला चे पांढरे कटटे भरताना दिसले त्यांना पंचासह जावुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी १) अक्षय संजय जाधव वय २२ वर्षे २) गणेश गजानन वाघ वय २६ वर्षे दोन्ही रा ओमकार कॉलनी हनुमान मंदिराजवळ असे सांगितले त्यांच्या गाडीची पाहणी केली असता त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी गाडी क्र एमएच ३७ जी १८४३ ची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचे वेगवेगळया कंपनीचे पांढऱ्या रंगाचे गुटखा व पान मसाल्याचे पोते मिळुन आले.

सदर वाहनातील माल चेक केला असता १)नजर ९०००/- गुटख्याचे पांढऱ्या रंगाचे १० पोते त्यात एकुण ५,३१,०००/- रु २)पान बहार पान मसाला पाढन्या रंगांचे प्लॅस्टीकचे ३ पोते त्यात एकुण १,६८,७५०/- रु एकुण ६,९९,७५० चा माल मिळुन आला. सदर गुटखा आरोग्यास अपाय कारक असल्याने शासनाने गुटखा, खर्रा, सुगंधीत तंबाखु, इत्यादीचे साठा, वाहतुक, विकी वर बंदी घातलेली असल्याने उपरोक्त माल व मालवाहतुकीसाठी वापरलेली एक मारुती व्हॅन एमएच ३७
जी १८४३ की, ६,००,०००/- असा एकुण १२.९९,७५०/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला.

यातील दोन्ही इसम
१) अक्षय संजय जाधव वय २२ वर्षे २) गणेश गजानन वाघ वय २६ वर्षे दोन्ही रा ओमकार कॉलनी हनुमान मंदीराजवळ यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करणेकामी पोलीस स्टेशन शिरपुर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव, पोहवा किशोर चिंचोळकर,सुनिल पवार, पोना
प्रशांत राजगुरु, राजेश राठोड, अमोल इंगोले, राजेश गिरी,प्रविण राऊत, पोका डिगांबर मोरे चापोना सज्ञानन जाधव यांनी सहभाग नोंदविला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!