Post Views: 696
पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशनच्या सभासदांमध्ये उत्सुकता.
अमरावती – महेश बुंदे
पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन या पत्रकार संघटनेला जवळपास ४ वर्ष पूर्ण होत आहे. हि पत्रकार संघटना जेष्ठ पत्रकार व संस्थापक अध्यक्ष किशोर आबीटकर, उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार एम.डी.चव्हाण, सचिव व युवा पत्रकार अनिल कदम, संस्थापक सदस्य व राज्य संघटक संदीप बाजड, संस्थापक सदस्य ईश्वरजी हुलवान, ताज्जुदिन शेख, मधुकरजी गलांडे, राजू जवंजाळ यांच्यासह आदी मान्यवरांनी एका व्यासपीठावरून पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन केली. या पत्रकार संघटनेचे कार्य संपूर्ण राज्य तसेच राज्याबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांसाठी विविध समस्या सोडवणे तसेच त्यांना विविध उपाय योजनांचा लाभ कसा मिळवून देता येतील यासाठी कार्य केले जातात.
पत्रकारांवर आलेली संकट, त्यांना प्रतीउत्तर देण्यासाठी ह्या पत्रकार संघटनेतील सभासद नेहमीच तप्तर असतात. पत्रकारांप्रती सहानुभूती असलेली हि एकमेव पत्रकार संघटना राज्यभरात पाहायला मिळते. या संघटनेचा प्रत्येक जिल्ह्यातून कार्यभार चालावा व स्थानिक पत्रकारांच्या समस्येचे निवारण व्हावे तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्याची पाट थोपटण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांची निवड हि निश्चितच केलेली असते. असेच अमरावती जिल्ह्याचे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्या उत्तम कार्याला आज ३ वर्ष पूर्ण झाले आहेत. जिल्हाध्यक्ष उमेश लोटे हे विदर्भ न्यूज वृत्तवाहिनीचे प्रबंध संपादक आहेत, मागील ३ वर्षात लोटे यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या अनेक मागण्या पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यासोबतच धडक मोर्चे, विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडलीत.
एवढचं नाही तर पत्रकारांना काही वर्षासाठी का होईना पण टोल मुक्ती सुद्धा मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले, तरी पुढेही टोल मुक्तीसाठी त्यांचा प्रयास सुरूच आहे. त्याचबरोबर जेव्हा जगभरात कोरोना विषाणूच्या थैमान होते तेव्हासुद्धा रस्त्यावर उतरून पत्रकारांनी नागरिकांप्रती जनजागृतीचे कार्य केले, त्या लॉकडाऊनच्या काळात पत्रकारांना केंद्र व राज्य सरकारने फ्रंट लाईन वर्करमध्ये सामावून घेतले नाही, म्हणून जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी पत्रकार मित्राप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आपल्या सहकारी पत्रकार मित्रांचा पॉवर ऑफ मिडिया संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित केले. पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेत जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा १ वर्षाचा असतो, मात्र जिल्हाध्यक्ष उमेशजी लोटे यांचे उत्कृष्ट कार्य बघता त्यांचा कार्यकाळ पत्रकार संघटनेच्या वतीने १ वर्ष वाढवून आज तो कार्यकाळ ३ वर्षाचा पूर्ण झाला आहे.
जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या कार्यकाळात अधिक कार्य केले असल्याने आता नवीन पत्रकारांनाही कार्य करण्याची संधी मिळावी असे प्रतीप्रादन उमेश लोटे यांनी केले आहे. यासाठी अमरावती जिल्हाध्यक्ष पदाचा नवीन मानकरी कोण असणार ? याची उत्सुकता आता पॉवर ऑफ मिडीयाच्या समस्त सभासदांना लागली आहे. विशेष म्हणजे नवीन पत्रकार संद्स्य नोंदणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे व अमोल नानोटकर यांनी दिली आहे.