5 फेब्रुवारीपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये,तंत्रनिकेतन व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग आज १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षरीत्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वाशिम यांनी दिले आहे.या आदेशात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी यांच्या १ फेब्रुवारीच्या आदेशात जिल्ह्यातील संबंधित शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन व तत्सम शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता ५ फेब्रुवारीपर्यंत आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील लसीकरणासाठी पात्र असतील त्यांचे लसीकरण करावे तसेच आरटी-पीसीआर चाचणी करण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!