प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक २०.०१.२०२२ रोजी तक्रारदार पुष्पा शिवाजी जाधव रा. शिरपुर यांनी त्यांचा मुलगा गणेश शिवाजी बाजड वय २१ वर्षे हा घरुन निघुन गेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन मिसींग क्रमांक ०२ नोंद करण्यात आले होते. तसेच सिंधुबाई घनश्याम मानवतकर रा. शिरपुर यांनी त्यांची मुलगी नामे शिवानी घनश्याम मानवतकर वय २० वर्षे ही घरुन काहीही न सांगता निघुन गेल्याबाबत दिलेल्या तक्रारी वरुन मिसींग नोंद क्रमांक ०३ अन्वये नोंद करण्यात आले आहे.दोन्हीही प्रकरणांचा तपास बिट अंमलदार महादेव चव्हाण यांचेकडे देण्यात आला होता.
त्यानुसार दोन्हीही मिसींग व्यक्तींना दिनांक २९.०१.२०२२ रोजी पोलीस स्टेशन शिरपुर येथे हजर केले.त्यावेळी त्या दोघांनीही त्यांचे एकमेकांवर प्रेम असुन ते दोघेही सोबत पळुन गेले होते असे
सांगीतले. तसेच गणेश व शिवानी यांनी एकमेकांसोबतच लग्न करण्याचे सांगीतले, परंतु दोघांच्याही घरची परिस्थीती जेमतेम असल्याने लग्नास लागणारा खर्च त्यांचेकडे नव्हता. त्यावेळी दोघांचीही समजुत घालुन, दोघेही लग्नासंबधाने दोन दिवस विचार करा असे सांगुन त्यांना आपआपले नातेवाईकांचे ताब्यात दिले.दिनांक ३१.०१.२०२२ रोजी गणेश शिवाजी जाधव व शिवानी घनश्याम मानवतकर हे दोघेही.त्यांचे नातेवाईकांसह पोलीस स्टेशन ला आले व त्यांनी लग्न करायचे आहे असे सांगीतले. त्यावेळी ठाणेदार सुनिल वानखडे यांनी पुढाकार घेत दोघांचेही आईची लग्नास संमती असल्याची खात्री केली.
