प्रतिनिधी सुनिल बटवाल
चिंबळी दि२७(वार्ताहर) करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून तंतोतंत पालन करत खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी कुरुळी मोई निघोजे केळगाव मरकळ सोळू धानोरे गोलेगाव विविध गावांमध्ये ग्रामपंचायत शाळा व विविध संस्थेच्या वतीने ७३वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुरूळी येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ध्वजारोहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस पाटील कारल्याचे पोलीस पाटील प्रतिभा कांबळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने चेअरमन बाळासाहेब कांबळे व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले .

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालकांच्या हस्ते करून तलाठी कार्यालयांचे भाऊसाहेब दिपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तर गेल्या दोन वर्षांपासून करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच या परिसरातील सर्व पत्रकार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व आजी माजी पदाधिकारी वर्गाच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व प्रमाण पत्र तसेच ट्राॅपी देऊन करोणा योध्दा म्हणून गुणगौरव व सत्कार करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी दिली.
