Post Views: 434
प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम वार्ता :-वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा धमाकेदार कामगीरी…दोन मोटारसायकल चोरांना अटक;
त्यांच्याकडून ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/रू. हस्तगत, वाशिम शहर पो.स्टे.डि.बी पथक आणी स्थागुशाची संयुक्त कार्यवाही
वाशीम वार्ता :-आपल्या चमकदार कारवाईमुळे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांचे पुन्हा एकदा कर्तव्यदक्षपणा अधोरेखीत झाला आहे.पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात आणी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वात स्थागुशा टिमने मोटारसायकलचोरांचा मोठ्या शिताफिने छडा लावुन चोरट्यांनाही जेरबंद केले आहे.ही संपुर्ण कारवाई स्थागुशा व वाशिम शहर डीबी पथकाने पुर्णत्वास नेली आहे.
दि. २८/०६/२०१८ रोजी फिर्यादी श्री. शेख मुजीब शेख बाबा, वय ३३ वर्ष,धंदा-मजुरी, रा. गंगू प्लॉट, वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे फिर्याद दिली होती की, दि. २६/०६/२०१८ रोजी रात्री ०१:०० ते ०७:०० वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल क. एम.एच. ३७ एक्स. ३०४५ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा रिपोर्ट वरून वाशिम शहर पोलीस स्टेशन अप. क.
२५९/२०१८, कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला.दि. १६/१०/२०२१ रोजी आरोपी नामे शिवाजी अशोक जाधव, वय २३ वर्ष, धंदा-मजुरी, रा. मोठा गवळीपुरा, वाशिम यास सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन त्यास सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा दि.
२०/१०/२०२१ रोजीपर्यंत पि.सी.आर. घेण्यात आला.
त्यानंतर सदर आरोपीकडे कसून चौकशी
केली असता त्याने वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथून आणखी ०३ मोटारसायकल चोरी केल्याचे
सांगितले व त्यापैकी ०२ मोटारसायकल या सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथील इसम नामे
विलास बाबुराव जाधव यास विकल्याचे व एक मोटारसायकल तो यापुर्वी काम करीत असलेल्या
उमरखेड, जि. यवतमाळ येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यासह सिंदखेड राजा येथे जाउन आरोपी इसम नामे विलास बाबुराव जाधव, वय २३ वर्ष, धंदा-मजुरी, रा. जिजामाता नगर झोपडपट्टी, सिंदखेड राजा, जि. बुलढाणा याच्याकडून एच.एफ. डिलक्स कंपनीच्या ०२
मोटारसायकल तसेच उमरखेड, जि. यवतमाळ येथून ०१ हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल अशा एकूण ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/- हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. धृवास बावनकर यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क.लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क.रामकृष्ण नागरे, पो.शि.क. मात्रे, पो.शि.क.विठ्ठल महाले व पो.शि.क. संदीप वाकुडकर यांनी पार पाडली असून सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.क. ३४७/लालमणी श्रीवास्तव हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची कर्तव्यदक्षता
मोटारसायकल चोरट्यांना मुद्देमालासहित जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा मोलाचा वाटा आहे.पथकप्रमुख सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वातील एपिआय अतुल मोहनकार,पिएसआय एसएम पठाण,कर्मचारी सुनिल पवार,अमोल इंगोले,प्रशांत राजगुरु,राजेश राठोड,राजेश गिरी पथक शिलेदारांनी शिताफीने आरोपिंना जेरबंद करुन मोटारसायकल मुद्देमाल्लही जप्त केला.स्थागुशाच्या कर्तव्यदक्षतेमुळे पुन्हा एकदा पोलीसांच्या कामगीरीत मानाचा तुरा रोवल्या गेला.