पंढरपूर वार्ता:- आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर दरवर्षीप्रमाणे यंदाही परेड केली जात आहे.

प्रत्येक भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनी रंग पंढपूरमधील मंदिरात देखील तिरंग्याचा रंग चढला आहे. प्रजासत्ताक दिनाला विठू राया रंगला तिरंग्यात विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

देशाचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने देशभरामध्ये साजरा होत आहे. आज संपूर्ण देश तिरंगी रंगात न्हाऊन निघत असताना विठुराया देखील या तिरंगी रंगात रंगला असून मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुणे येथील देवाचे भाविक सचिन चव्हाण संदीप पोकळे राहुल पोकळे संतोष पोकळे भोलेश्वर पोकळे आणि विक्रम गुरु यांनी ही सजावटीची सेवा दिली आहे.हे तिरंग्याची सजावट करताना झेंडू शेवंती आणि कामिनी या 750 किलो फुलांचा अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. या सोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर आज तिरंगी उपरणे देखील घालण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी एक अनोखी भेट ठरली आहे.



