प्रतिनिधी फुलचंद भगत /वाशीम
जुन्या घरावर पोलिसांची धाड; सापडला दोन कोटींचा गुटखा,पोलिसही चक्रावले
पोलिसांनी दोघांना केली अटक : पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई
वाशिम:-वाशिम जिल्ह्यात अजुनही प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला प्राप्त होत असल्याने पोलिस अधिक्षक यांच्या नेतृत्वात सर्वात मोठी कारवाई करुन तब्बल दोन कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून आरोपिंना जेरबंद करण्यात आले आहे.
राज्यात अंमली पदार्थविरोधी कारवाया गाजत असतानाच वाशिम पोलिसांनी एका जुन्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल दोन कोटींचा गुटखा सापडला आहे. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई गुटख्याच्या साठा सापडला.
वाशिम जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना कळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना स्वतःच्या नेतृत्वात अचानक रिसोड शहरात धाड टाकली.शहरातील धोबी गल्लीत असलेल्या एका जुन्या घराची झाडाझडती घेतली. पोलिसांनी घराला लावलेलं कुलूप तोडलं. घरात पोहोचल्यानंतर गुटख्याचा साठा पाहून पोलीस अधीक्षकांसह पथकातील पोलीसही अवाक् झाले. घरातील तीन खोल्यांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याचा साठा आढळून आला.
