२०२१ मधील मुंग, उडीद पिकाच्या नुकसान भरपाई तुन सुटलेले कोकर्डा मंडळातील पात्र शेतकरी लाभार्थींना त्वरित नुकसान भरपाई मिळण्यात यावी, या मागणीला घेऊन कोकर्डा भागातील शेतकऱ्यांनी झेंडा चौकात रविवार पासून (दि.२३) दोन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
हे साखळी उपोषण दोन दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल, अशी माहिती उपोषणकर्ते श्रीकृष्ण पाटील सावरकर यांनी दिली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.