163 केसेस व 85000/-रूपये दंड वसुल
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासुन रस्ते वाहतुकीसंबंधाने अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीपणे पुर्ण सुध्दा केलेले आहेत. वाशिम जिल्हयामध्ये
मोटरसायकल अपघाताचे प्रमाण जास्त असुन अपघातामध्ये हेल्मेट परीधान न केल्यामुळे मृत्यू पावल्याचे संख्या अधिक आहे. सदर बाब विचारात घेवुन वाशिम जिल्हयामध्ये हेल्मेट सक्ती हा उपक्रम हाती घेवुन जे मोटरसायकल चालक हेल्मेट परीधान करणार नाही, अशा वाहन चालकांविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई करुन जिवितहानी
होणार नाही या दृष्टीकोनातुन प्रयत्न करीत आहेत.
