स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण मधील आंबेठाण चौकातील नामदेव नगर येथे आज स्व आमदार सुरेश गोरे यांच्या स्मरणार्थ व पोस्ट खात्याच्या सयुंक्त विद्यमाने 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांचे मोफत आधार कार्ड व सुकन्या योजनेचे आयोजन केले होते. प्रभागातील मा नगराध्यक्षा मंगलाताई गोरे व रोनक गोरे यांच्या प्रयत्नातुन आज सकाळी 9 ते 5 या वेळेत लहान मुलांचे आधार कार्ड व सुकन्या योजनेचे खाते काढून देण्यात आले.

“सरकार आपल्या दारी” या पोस्ट खात्याच्या उपक्रमाच्या माध्यमातुन नामदेव नगर येथे मा नगराध्यक्ष यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी दिवसभरात 95 लहान मुलांचे मोफत आधार कार्ड काढून देण्यात आले.तसेच मुलींकरता शासनाच्या पोस्ट खात्याच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील लहान मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे 52 पालकांना आपल्या लाडक्या लेकीचे खाते काढून देण्यात आले. त्यामुळे पालकांना भविष्यात आपल्या मुलींकरता तिच्या स्वप्नांना भरारी देण्याचे या योजनेतून सोय होणार आहे. या उपक्रमात अनेक नागरिकांनी आपल्या पाल्याचे आधार कार्ड व सुकन्या योजनेचे लाभ घेण्यासाठी दिवसभर गर्दी केलेली पाहायला मिळाली.
