ठाणे वार्ता :- दि.१४/०१/२०२२/ मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना गंडा घालणारा मि. नटवरलाल यांस ठाणे गुन्हे शाखेकडून अटक. मिळालेल्या माहितीनुसार
मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना स्वतः उच्चपदस्य अधिकारी शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन पसार होणारा इसम नामे आदित्य @नव्हुश @ तन्मय प्रशांत म्हात्रे या महाठगास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसामध्ये जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम अशा मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री जय जीत सिंह यांनी त्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव मालमत्ता शाखा गुन्हे शाखा यांनी शोध घेण्यास सुरवात केली होती.
कल्याण येथे एका महिलेने लग्न जमवणारी संस्था जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साईटवर आपले प्रोफाईल टाकले होते. त्यातून तिला वर नमूद इसमाने आपण इस्त्रो मध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ असून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावरून ओळख वाढवून सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १४,३६,०००/- रु वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात घेऊन त्यांना पुन्हा २५,००,०००/- ची मागणी केली त्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन रीतसर ०६/२०२२ भादवि कलम ४२०,४०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी अन्वये तक्रार नोंदवण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास चालू होता यातील वर नमूद पाहिजे आरोपी हा नेहमी राहण्याचे ठिकाण बदलत होता त्यामुळे तो काही केल्या मिळून येत नव्हता. त्याच वेळी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव मालमत्ता शाखा गुन्हे शाखा यांचे पथकाने त्याबाबत समांतर तपास करून सदर आरोपी याच्याबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून तो आणखी एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याचे निमित्ताने वाशी येथे भेटायला आला असता त्यास पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो इसम विवाहित असून त्यास एक मुलगा देखील आहे. तो नामा, इन्त्रो मध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ अथवा मोठ्या पदावर नोकरीस असाल्याची थाप मारून त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याबाबत अधिक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत त्याबाबत तपास चालू असून सदर आरोपीतास मा. न्यायालयाने दि.२०/०१/२०२२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे.
१) दिंडोशी पोलीस स्टेशन मुंबई गु रन ५२६/२०१९ कलम ४२०, ४६७ भादवि अन्वये २) खडकपाडा पोलीस स्टेशन ०६/२०२२ कलम ४२०, ४०६ भादवि अन्वये
३) पार्कसाईट पोलीस स्टेशन विक्रोळी मुंबई १३/२०२२ भादवि ४२०, ४०६ अन्वये
४) सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी पुणे १५४/२०१९ कलम ४२०४०६ भादवि अन्वये ५) अलिबाग पोलीस स्टेशन १९६/२०१९ कलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधि
६) रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई गुरन १९/२०२० कलम ४२० भादवि६६ (डी)
माहिती तंत्रज्ञान अधि अन्वये :- ७) ए पि एम सी पोलीस स्टेशन नवी मुंबई गु र न १९६/२०१९ भादवि १७१, ४२०,३५४६६ (ए), माहिती तंत्रज्ञान अधि. ६६ (ए) (सी)