लाखाळा वाशिम येथील दरोडयाच्या गुन्हयाची २४ तासात ऊकल करुन आरोपी गजाआड

लाखाळा वाशिम येथील दरोडयाच्या गुन्हयाची स्थानिक गुन्हे शाखा वाशिम चे पथकाने २४ तासात ऊकल करुन आरोपी गजाआड केले

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-दिनांक १३/०१/२०२२ रोजी फिर्यादी किशन शशिकांत देवानी रा माधव नगर लाखाळा यांनी पो.स्टे
वाशिम शहर येथे रिपोर्ट दिला की ते व त्यांचे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आडतचे व्यापारकामी दुकानावर असताना दिनांक १२/०१/२२ रोजीचे सायंकाळी ०७.०० वाजता दरम्यान ३० ते ४० वयोगटातील ५ ते ६ इसम दरोडा टाकण्याच्या उददेशाने जबरीने घरात घुसले व घरात हजर असलेल्या महिलांना धारधार शस्त्राचा धाक दाखवुन घरातील मोबाईल घेऊन पळुन गेले.

अशा फिर्यादी च्या जबानीवरुन वाशिम शहर येथे अपक्र ३८/२२ कलम .३९५ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे / पोलीस स्टेशनचे अधिकारी/अंमलदार यांची पथक तयार करुन सदर दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशीत केल्यावरुन पोनि जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी / अंमलदार यांची वेगवेगळी पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता प्रयत्न सुरु केले गोपनिय माहितीच्या आधारे अंजनखेडा येथे रवाना होवुन १) लखन ऊर्फ इश्वर रामभाऊ पायघन वय ३८ वर्षे रा. अंजनखेडा २) पुंजाजी किसन इढोळे वय ५५ वर्षे रा. दोडकी ३)विठठल काशीराम पायघन वय ३० वर्षे रा. अंजनखेडा यास ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविला असता
त्यांनी त्यांचे साथिदारासह गुन्हा केल्याचे कबुल केले.

यातील आरोपी क्र २ पुंजाजी इढोळे याचेकडे रेती व वाळुचे दोन टिप्पर आहेत. त्याने घेतलेले दोन टिप्पर व शेतीवर अंदाजे ९० लाख रुपयांचा कर्ज होता, याचेवर काढलेले कर्ज फेडण्याकरीता तसेच शेतीवर असलेले कर्ज फेडण्याकरीता पुंजाजी याने त्याचे साथीदारांसह पुसद नाका व लखन पायघन याचे धाब्यावर गुन्हयाचा कट रचला. लाखाळा येथील देवाणी यांचे घरात आपल्याला अंदाजे १ ते २ कोटी रुपये मिळतील याकरीता पुंजाजी याने देवाणी यांचे घराची पाळत ठेवून प्लांनीग केली व सदरचा गुन्हा केला.नमुद गुन्हयानीले तपासात तीन आरोपीतांना अटक केली असुन इतर आरोपींचा शोध घेणे कामी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.यातील आरोपीतांवर जबरी चोरी, सोयाबीन चोरी, घरफोडी असे वाशिम जिल्हा व बुलढाणा जिल्हा येथे विवीध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.


सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे “मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,स.पो.नि अतुल मोहनकर, प्रमोद इंगळे, विजय जाधव पो.उप.नि पठाण,पो.हवा बाळु कंकाळ, सुनिल पवार,गजानन अवगळे,दिपक सोनावणे,किशोर चिंचोळकर, पो.ना राजेश गिरी,राजेश राठोड,अमोल इंगोले,प्रविण राऊत,गजानन गोटे, राम नागूलकर, पो.शि डिगांवर मोरे, शुभम चौधरी, संतोष शेणकुडे, निलेश इंगळे, चालक पो.कॉ संदीप डाखोरे, गजानन जाधव सायबर सेल गोपाल चौधरी व प्रशांत चौधरी व पो. स्टे.वाशिम शहर येथील पोलीस पथक यांनी सहभाग नोंदविला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाशिम शहर हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!