महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चाकण आणि कलाविष्कार मंच चाकण यांच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

चाकण- राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चाकण परिसरातील ५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलिस अधिकारी उज्वला घनवट यांना राजमाता जिजाऊ, सुवर्णा वाडेकर यांना जिजाऊ-साऊ आदर्श माता, स्मिता धुमाळ यांना क्रांतीज्योती आदर्श शिक्षिका, गीता सावंत-सातपुते यांना सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार, तर वैष्णवी गोरे यांना जिजाऊ युवती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चाकण आणि कलाविष्कार मंच चाकण यांच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कर्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सोळंकी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्या नंदिनीताई जाधव म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन समाजात महिलांनी पुढे यावे. समाजात घडलेल्या अनिष्ट प्रथांना बाजूला सारून नवीन भारत घडवण्यासाठी स्त्रियांनी पुढे येऊन आदर्श घडवावा.

मिलिंद देशमुख म्हणाले, समाजातील अनिष्ट चालीरीती विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पुढाकार घेऊन समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केला. याप्रसंगी पोलीस अधिकारी मोरमारे, प्राचार्या माधुरी गोरे, गोरक्षनाथ बारवकर, राजेंद्र वाडेकर हेही उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!