राजापेठ उड्डाणपूल वर श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा स्थापन करण्यात आली सुरक्षा अभावी प्रतिमेची देखभाल कशी होणार अनेक लोकांची विचारपूस –
प्रसिद्धीसाठी आमदार रवी राणा यांची नवीन स्टंटबाजी युवकांमध्ये व शिवभक्त मध्ये नाराजी
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना रातोरात करण्यात आली होती त्याबद्दल रवी राणा यांनी रात्री शिवाजी महाराज ची स्थापना का करण्यात आली अशी विचारपूस करण्याकरिता अनेक शिवभक्त ठिकाणी गोळा झाले होते व लोकांची गर्दी जमली होती त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता .
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दोन वाजता आमदार रवी राणा व काही कार्यकर्ते यांनी प्रतिमेची स्थापना केली त्याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी मॅडमची परवानगी न घेता प्रतिमेची स्थापना करण्यात आली स्थानिक लोकांचे मन्या प्रमाणे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची देखभाल पूर्णपणे करण्यात यावी आणि कोविडचा नियमानुसार उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलिसांनी जमाव शांत करून परिस्थिती आटोक्यात आणली