Post Views: 422
(संस्था कार्यालय ऑफिसचे काम सुरू )
दर्यापूर – महेश बुंदे
मराठा सेवा संघ दर्यापूर तालुक्याच्या वतीने तहसील समोर बसलेली भव्य दिव्य मोकळ्या जागेत सैनिक कॉलनीच्या बाजूला असलेल्या संस्थेच्या जागेमध्ये संस्थेचे कार्यालय उभारणी सुरू झाली असून आज मा साहेब जिजाऊंचा जन्मोत्सव कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या मोकळ्या जागेवर संस्थेचे कार्यालय उभारण्याकरिता जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक भास्कर पाटील पवित्रकार यांनी ५१ हजार रुपये, शरदराव रोहणकर ज्येष्ठ पत्रकार यांनी ३१ हजार तसेच साहेब पाटील जंवजाळ यांनी २१ हजार, या व्यतिरिक्त सेवानिवृत्त ग्रामसेवक कावडकर व मधुकरराव कुलट सेवा निवृत लिपिक प.स यांचे सुद्धा मोठे योगदान मिळालेले आहे व त्याच भावनेतून आज मराठा सेवा संघाच्या दर्यापूर सेवा शाखेचे कार्यालय उभारणी सुरू असून भविष्यात एक सुंदर वसतिगृहाचे काम मराठा मंगल कार्यालय उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.
त्याकरिता आजी-माजी अध्यक्ष संस्थेचे पदाधिकारी यांनी मोठ्या उदार अंतकरणाने मदत करावी असे गजाननराव कोरे यांनी केले असून त्यांनी स्वतः ५१ हजार रुपये देण्याचे कार्यक्रम प्रसंगी जाहीर केले तसेच सर्व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्वांनी मदत करावी असे आवाहन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक गजानन देशमुख प्रेस क्लब सचिव दर्यापूर यांनी केले आहे.