Post Views: 728
४ लक्ष ४९ हजारचा मुद्देमाल जप्त,PSI अनंत हिवाराळे यांची कामगिरी
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील खल्लार परिसरामध्ये विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर शनिवारी खल्लार पोलिसांनी पकडला. यामध्ये ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला असून, ४,४९००० रुपयांचा मुद्देमाल खल्लार पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही खल्लार पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे यांनी केली.
खल्लार परिसरामध्ये रात्री अवैध रेती वाहतूक करणारे तस्कर वर डोकं काढत आहेत. अशातच खल्लार पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे यांना खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील वडूरा येथील पूर्णा नदी पात्रातुन, रात्री अवैध रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे अनंत हिवराळे यांनी शनिवार ८ जानेवारी रोजी रात्री वडूरा गाव ते पुनर्वसनकडे येणाऱ्या मार्गावर सापळा रचला. सापळ्या दरम्यान सकाळी ४ वाजता एक ट्रॅक्टर वडूरा गावाकडून पुनर्वसनकडे येतांना पोलिसांना आढळला. परंतु ट्रॅक्टर चालक याला पोलिसांचे वाहन दिसले असता, ट्रॅक्टर चालकाने रेतीने भरले असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रोडवर उभी करून अंधाराचा फायदा घेत तो पसार होण्यात यशस्वी झाला. विना क्रमांक असलेला निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व ट्राली अंदाजे किंमत ४ लक्ष ४५ हजार रुपये तसेच, ट्रालीमध्ये असलेली एक ब्रास रेती अंदाजे किंमत ४००० रु. असा एकूण ४,४९००० रुपयांचा मुद्देमाल खल्लार पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी खल्लार पोलिसांनी कलम ३७९, ५०(१) मो वि अक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे.
ही कार्यवाही खल्लार पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात खल्लार पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे, पोकॉ. विनोद ढगे, वाहन चालक सुशांत कडू यांनी केली, तरी पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा शोध खल्लार पोलीस घेत आहे.