अमरावती : लोखंडी शिडीला ११ केव्हीच्या तारांचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात चौघांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला.
कठोरा रोडस्थित पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ही हृद्यद्रावक घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
