Post Views: 712
आळेफाटा येथील व्ययीकाच्या साई इलेक्ट्रॉनिक दुकाणात पडलेल्या दरोडयातील ६ आरोपींना केले अवघ्या २ दिवसात जेरबंद.
जुन्नर वार्ता :- दि. ०६ / १२ / २०२१ रोजी रात्री १०:०० वा. चे सुमारास मौजे आळे गावचे हददीत नगर कल्याण हायवे रोडचे कडेस असणारे विचकाई मळा येथील अविनाश जालींदर पटाडे यांचे मालकीचे साई इलेक्ट्रॉनिक नावचे दुकानात ६ अनोळखी इसमांनी अविनाश पटाडे यांचे दुकाणामध्ये येवुन अॅप्लीफायर रिपेअर करायचा आहे असा बनाव करून दुकाणाचे शटर खाली घेवुन फिर्यादी यांना त्यांचे जवळील पिस्तुलीचा धाक दाखवुन जबरदस्तीने दरोडा टाकुण २१,०००/-रु. किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम असे जबरदस्तीने घेवुन गेले बाबत फिर्यादी नामे अविनाश जालींदर पटाडे, वय ४१ वर्षे, व्यवसाय- इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरींग, रा. बोरी बु, ता. जुन्नर जि. पुणे यांनी दिले
फिर्यादीवरून आळेफाटा पो.स्टे गुरनं ३९४/२०२१, भा.दं. वि. का. कलम ३९५ सह • भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे दाखल करणेत आला होता. सदरचा गुन्हा हा अनोळखी आरोपींनी केला होता व सदर गुन्हा करतेवेळी आरोपींनी मागे कोणताही पुरावा ठेवलेला नव्हता त्यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे होते.
सदरचा गुन्हा हा आळेफाटा सारख्या मुख्य बाजारपेठेत घडल्यामुळे स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सो पुणे ग्रा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नितेश घटटे सो पुणे ग्रा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मंदार जवळे सो, जुन्नर विभाग, जुन्नर यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देवून योग्य त्या सुचना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची संयुक्त तपास पथके तयार केली होती व त्या अनुशंगाने पोलीस तपास पथके सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते.
फिर्यादीवे यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकणामध्ये बॅन्ड डीजे साउंडशी संबंधीत असल्यामुळे यातील आरोपींनी देखील डी. जे. शी संबंधीत चौकशी केली होती. त्यावरून तपास पथकांनी त्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून तसेच आरोपींनी परीधान केलेल्या कपड्यांवरून व त्यांचे वर्णनावरून पुणे अहमदनगर जिल्हयामध्ये माहीती काढण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाला त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फतीने मिळाले
बातमीवरून सदर गुन्हयातील संशयीत इसम नामे १) ऋषिकेश बळवंत पंडीत, वय २२ वर्षे, रा. खरखंडी, खळवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर २) अरबाज जबाब शेख वय २० वर्षे, रा. वडाळा व्हरांगा ता. नेवासा जि. अहमदनगर ३) वैभव रवींद्र गोरे, वय २२ वर्षे, रा. खखंडी ता. नेवासा जि. अहमदनगर ४) राहुल राम चव्हाण, वय २० वर्षे, रा. खरखंडी ता. नेवासा जि. अहमदनगर ५) प्रकाश विजय वाघमारे, वय २० वर्षे, रा. माळी चिंचोरा ता. नेवासा जि. पुणे. ६) शुभम बाळासाहेब शिंदे, वय २१ वर्षे, रा. खरवंडी खळवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर यांना यांना अहमदनगर जिल्हातुन वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीत यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेले असुन सदर कारवाईमुळे आळेफाटा परीसरातील व्यापारी वर्ग व जनतेमथुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कारवाई श्री. अभिनव देशमुख सो, मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा, श्री. मितेश घटटे सो, मा. अधीक्षक पुणे ग्रा, श्री. मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, जुन्नर अप्पर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अशोक शेळके, पोलीस निरीक्षक स्थागुशा पुणे ग्रा, श्री. प्रमोद श्रीरसागर, पोलीस निरीक्षक, आळेफाटा पोलीस ठाणे, सपोजि नेताजी गंधारे, स्थागुशा पुणे ग्रामीण, सपोनि सुनिल बडगुजर आळेफाटा पो.स्टे, पो. हवा. दिपक साबळे, पो.हवा. राजु मोमीन, पोना. संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, पोकों निलेश सुपेकर, पोकॉ दगडु विरकर, पोको प्रसन्ना घाडगे, पोहवा/ प्रमोद नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रा व आळेफाटा पोलीस ठाणेचे पोसई रघुनाथ शिंदे, पोसई राजेंद्र पवार, मपोसई रागिनी कराळे पोहया/ चंद्रशेखर डुंबरे, पोहया/ विनोद गायकवाड, पोहया/लहानु बांगर, पोकों/अमित माळुंजे, पोकों/निखिल मुरुमकर, पोकॉ/मोहन आनंदगावकर, पोकों/ हनुमंत ढोबळे, पोकों/महेश काठमोरे, पोको/अरविंद वैदय, पोकों/प्रशांत तांगडकर, पोकॉ/गोरक्ष हासे व ओतुर पोलीस स्टेशनचे पो.स. ई. अनिल केरुरकर, पो. हवा. महेश पठारे तसेच जुन्नर पोसई युवराज पाटील, पोकॉ/किशोर जोशी यांनी केलेली असुन सदरचा गंभीर स्वरूपाचा दरोडयाचा गुन्हा अवघ्या २ दिवसात उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.