कोण पेटवतंय एसटी आंदोलन? आगारातून एसटी सुटली म्हणून धावत्या बसवर दगडफेक, प्रवाशांच्या जीवाशी खेळ…

प्रतिनिधी ओम मोरे

अमरावती : राज्यभर सध्या एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहे अशातच संपला झुगारून मोर्शी बस आगारातून अमरावती-मोर्शी बससेवा सुरू करण्यात आली. ही बस मोर्शी आगारातून अमरावती, मोर्शी-वरुड या ठिकाणी पाठवल्या गेली. मात्र, परत अमरावती आगारात येत असताना वेलकम पॉईंट समोरील अर्जुन नगर परिसरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. त्यामुळे बसमधील असलेल्या प्रवाशांमध्ये काही वेळ भीती निर्माण झाली होती. या घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली.राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या एक महिना एक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संपही कायम आहे. मात्र या संपाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागत आहे. आता जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

मोर्शीहून अमरावतीकडे परतणाऱ्या (एमएच ४०, एन – ९१२८) हा क्रमांक असलेली बस प्रवाशांना घेऊन अमरावती आगारात येत असतांना रात्री ८ वाजता दरम्यान अर्जुन नगर परिसरात अज्ञातांकडून बसवर दगडफेक झाली. यामध्ये बसची समोरील काच फुटली. असून गाडगे नगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!