जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक एड्स दिन साजरा

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या हस्ते आयईसी स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. यादव, डॉ. थोरात, डॉ. हेडाऊ, डॉ. मडावी, डॉ. परभणकर, डॉ. मुंढे, मेट्रन चव्हाण व श्रीमती हजारे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून डॉ. खेळकर यांनी युवकांमध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मातेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. आहेर यांनी सर्वांनी आपली एचआयव्ही तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगून एचआयव्ही एड्सबाबत माहिती दिली.

जिल्हयातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एचआयव्ही एड्स जनजागृतीबाबत तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन यावेळी लावण्याल आले होते. यामध्ये पोस्टर्स, स्लोगन, मास्क डिझाईन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे पारितोषिक यावेळी वितरीत करण्यात आले. पोस्टर्स स्पर्धेमध्ये प्रथम- रुषिकेश खानझोडे, व्दितीय- मयुरी ठोंबरे, तृतिय शुभम गायकवाड, स्लोगन स्पर्धा प्रथम- अमर पवार, व्दितीय- रुषिकेश जोगदंड, तृतिय आकाश घटमाळ. मास्क्‍ डिझाईन स्पर्धा प्रथम- अमिता कांबळे, व्दितीय- मयुरी गवई, तृतिय- शुभम खंडारे यांना रोख बक्षिस व स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले.

कामाच्या आधारे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पंढरी देवळे, आयसीटीसीचे समुपदेशक अर्चना ठाकरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिशा वरीद यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी एचआयव्ही एड्स प्रतिबंधाबाबत उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, डाटा मॅनेजर धम्मपाल मनवर, समुपदेशक मिलींद घुगे, सम्राट गायकवाड, अनिल राठोड, फार्मशिस्ट राजू मेसरे, विनोद रत्नपारखे, रामा कांबळे, संगीता आगासे, सुलोचना मोरे, योगीता देशमुख, अर्चना ठाकरे, जया वानखेडे, प्रतिभा अवचार, स्टाफ ब्रदर निलेश अल्लाडा, सीसीसी बाबाराव भगत, प्रशांत फुके, सचिन दंडे, वसीम तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्वागत गीत नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीनी स्वप्नाली राऊत यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक पंढरी देवळे यांनी केले. आभार संगीता आगासे यांनी मानले. कार्यक्रमाला शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!