अमरावती हिंसाचार प्रकरणात आज पुन्हा सहा आरोपींना अटक

प्रतिनिधी ओम मोरे :-

अमरावती | दि. १२.११.२०२१ व दि.१३.११.२०२१ रोजी अमरावती शहरामधे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन जातीय तणाव निर्माण झालेला आहे, यामध्ये काही मोर्चेकऱ्यांनी बाजारपेठेतील दुकानावर दगडफेक करून तोडफोड केली व दुकानांना, वाहणांना आग लावुन नुकसान केले. अनियंत्रीत जमावाला पांगविण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आंदोलनकाऱ्यांना हुसकावून लावुन मोठ्या प्रमाणात होणारी हानी आटोक्यात आणली.

या आंदोलनादरम्यान काही विकृत लोकांनी सोशल मिडीयावर चुकींचे संदेश प्रसारित केल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले होते. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यां विरुध्द विविध पोलीस स्टेशनमध्ये एकुण ५५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.आज दि. २९.११.२०२१ सदर घटनेबाबत विशेष अभियान राबवुन शहरामध्ये उपद्रव व दंगा करणाऱ्या एकुण ०६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई डॉ. आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. आतापावेतो ४११ आरोपीतांना अटक करण्यात आलेली असुन इतर आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मा.डॉ. आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांनी केलेले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!