सलग नवव्या दिवशीही महिला उपोषणकर्त्यांची प्रशासनाकडून दखल नाही,कडाक्याच्या थंडीतही महिलांचा निर्धार कायम

वंचित बहुजन आघाडी आक्रमक
जिल्हा प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टीमेटम, जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम – कोणतेही ठोस कारण न देता नगरपालीकेने शहरातील घरकुलाची प्रकरणे नामंजूर केल्याच्या कारणावरुन लाभार्थी महिलांनी 22 नोव्हेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या साखळी उपोषणाची धग ऐन थंडीतही कायम आहे. उपोषणकर्त्यांचा महिलांचा निर्धार कायम असला तरी 9 दिवस उलटुनही जिल्हाप्रशासनाकडून या उपोषणाची दखल न घेतल्या गेल्यामुळे महिलांमध्ये नगरपालीका तसेच जिल्हा प्रशासनाच्या काराभाराविरुध्द तीव्र रोष व्याप्त झाला आहे.


दरम्यान घरकुलाच्या सावळ्यागोंधळाबाबत वंचित बहूज आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून 26 नोव्हेंबर रोजी जि.प. समाजकल्याण सभापती सौ. वनिता देवरे व कार्यकर्ते संतोष इंगळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे दोन दिवसात घरकुलाचा प्रश्न न सोडविल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान उपोषण मंडपाला विविध पक्षाचे पदाधिकारी व नेतेमंडळींनी भेट देवून उपोषणाला पाठींबा दिला आहे.


शासनाच्या सर्वासाठी घरे – 2022 या धोरणानुसार प्रत्येक गरजु कुटुंबाला घरकुल मिळाले पाहीजे ही शासनाची योजना आहे. मात्र या योजनेला अधिकार्‍यांकडून सुरुंग लावल्या जात असून त्यामुळे गोरगरीबांचे स्वत:च्या घराचे स्वप्न भंग पावले आहे. शहरातील पंचशिलनगर, शेलु रोड, विट भट्टी खदान, हॅप्पी फेसेस शाळेजवळ, चामुंडा देवी, भिमनगर, निमजगा, वाळकीरोड, शुकवारपेठ, काजीपट्टी, माहुरवेश, इनामदारपुरा, गवळीपुरा, नारायणबाबा मंदीर, घानमोडी, वाळकी मजरे, इत्यादी वस्तीतील घरकुल लाभार्थ्याची नावे जाहीर करण्यात आली आहेत. असे असतांना कोणत्याही सक्षम कारणाशिवाय न.प. मुख्याधिकारी यांनी समितीने दिलेल्या पत्रातील संदर्भ क्र. 7 नुसार या भागातील लाभार्थ्यांच्या घरकुलाची प्रकरणे हे सरकारी जागेवरचे असल्यामुळे नामंजूर करण्यात येत असल्याचे कळविले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी सुध्दा मुख्याधिकार्‍यांना शासन निर्णयानुसार कार्यवाही करुन लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचे आदेश पत्राव्दारे दिले होते. तरीही मुख्याधिकार्‍यांनी शासकिय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा शासन निर्णय असतांना शेकडो लाभार्थ्यांच्या घरकुलाची प्रकरणे नामंजुर केले आहेत. या अन्यायाविरुध्द मालती गायकवाड, रुपाली इंगळे यांच्यासह असंख्य लाभार्थी महिलांनी आंदोलनाची भूमिका घेवून साखळी उपोषणाचा प्रारंभ केला आहे.


सलग नवव्या दिवशी सुरु असलेल्या या आंदोलनाची दखल जि.प. सभापती सौ. वनिता देवरे यांनी घेवून जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. वंचितचे महासचिव सिध्दार्थ देवरे यांनी शहरात केलेले सर्र्वेक्षण व पाहणीमध्ये अनेक गरीब कुटुंबांना राहायला घर व शौचालय सुध्दा नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना दोन दिवसात न्याय मिळाला नाही तर वंचितच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सौ. देवरे यांच्यासह महासचिव सिध्दार्थ देवरे, कार्यकर्ते संतोष इंगळे यांनी दिला आहे.
या साखळी उपोषणामध्ये मालती गायकवाड, रुपाली इंगळे, दिपा खडसे, राधा धबाले, राधा खडसे, रत्ना कापडे, चंदा कांबळे, विमल डोंगरे, शिल्पा खडसे, शारदा खडसे, रंजना धबाले, बेबी भगत, खैरुनबी शे. रशीद, दुर्गा धबाले, उज्वला धबाले, बेबी भगत, जया कांबळे, रेणूका खराटे, उमा पाटीदार, सिमा पाटीदार, माया भगत, पुनम बलखंडे, सुंदराबाई बलखंडे, कांचन धबाले, वनिता जाधव, शिला ठोके, पार्वती करणे, कल्पना कंकाळ, वंदना बलखंडे, निता वानखडे, पायल बंगाळे, उषा गवारे, मंगला खिल्लारे, छाया कांबळे, दत्ता धबाले, अमृता खिल्लारे, माया इंगोले, जिजाबाई इंगोले, बालु खडसे, बाली धबाले, रुक्साना पठाण आदी महिला बसल्या आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!