दर्यापूर – महेश बुंदे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर येथे दि. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक गोपालराव गौरखेडे, उपमुख्याध्यापिका सौ. कल्पना धोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले, त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्याच्या समवेत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, शाळेतील कु. राजेश्ररी ठाकरे, कु. अदिती रायबोले कु. नंदिनी गणोदे व कु. श्रध्दा कराळे या विद्यार्थीनीनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकडे, शिक्षकेतर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे, या कार्यक्रमाचे संचलन पाटील मॅडम कु. प्रणाली चंदन व आभार सौ. खरड मॅडम व कु. सानिका सावळे यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
