नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनता महागाईने प्रचंड हैराण झालीय. विशेषतः घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर जाऊन पोहोचलीय. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेय.कोरोनाच्या काळात गेल्या काही काळापासून जनतेला बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. पण आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सबसिडीचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना केंद्र सरकार ते पुन्हा देण्याचा विचार करीत आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर करात सूट दिल्यानंतर केंद्र सरकार स्वयंपाकघरात राबणाऱ्या गृहिणींना काहीसा दिलासा देऊ शकते.
303 रुपयांची सवलत मिळण्याची शक्यता
ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून गॅस डीलर्सना मिळालेल्या संकेतांनुसार सरकार एलपीजी सिलिंडरवर 303 रुपयांपर्यंत सूट देण्याचा विचार करीत आहे. जर तुम्हाला सध्या 900 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत असेल तर तो तुम्हाला 587 रुपयांपर्यंत मिळू शकेल. शेवटच्या वेळी हे अनुदान 2020 च्या एप्रिलमध्ये 147.67 रुपये मिळाले होते. पण तेव्हा घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 731 रुपये होती, जी सबसिडीनंतर 583.33 रुपये मिळत होती. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 205.50 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर 655 रुपयांनी महागला.
यामुळे अनुदान बंद होऊ शकते
जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. प्रथम म्हणजे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक बरोबर प्रविष्ट केलेला नाही. तुम्ही या वर्तुळात न येण्याचेही एक कारण असू शकते. मात्र, एलपीजी सिलिंडरची सब्सिडी तुमच्या खात्यात जात आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर ते शोधण्याचा मार्ग काय आहे, तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा कोणाला विचारण्याची गरज नाही. हे तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत ऑनलाइन सहज जाणून घेऊ शकता. ही पद्धत खूप सोपी आहे.
सध्या सगळ्या ग्राहकांना बाजारभावानुसारच इंधन घ्यावं लागतं. प्रत्येक घरासाठी सरकार वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलेंडर सबसिडीने देते. यामध्ये सबसिडी थेट ग्राहकांच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा होते. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जाहीर केले जातात. आता सरकार कडून एलपीजी गॅस सिलेंडर साठी सबसिडी वाढवण्यात आली आहे. मग आता तुमच्या IOCL, HP आणि BPCL च्या गॅस सिलेंडर मध्ये तुमच्या सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली आहे क? हे कसं, कुठे तपासाह? हे जाणून घेण्यासाठी इथे पहा प्रक्रिया.
ऑनलाईन कशी तपासाल सबसिडी?
- http://mylpg.in/
- http://mylpg.in/ ला भेट द्या.
- उजव्या बाजूला LPG ID टाईप करण्यासाठी जागा असेल तेथे तो टाका. तुमचा OMC LPG कोणताही असला तरीही काही आवशयक माहिती विचारली जाईल ती भरा.
- त्यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचे डिटेल्स टाका.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
- पुढील पानावर तुमचा ईमेल आयडी टाका आणि पासवर्ड बनवा.
- आता तुमच्या ईमेल आयडी वर अॅक्टिव्ह लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करा.
- आता पुन्हा mylpg.inवरील तुमच्या अकाऊंट वर लॉगिन करा.
- पॉप अप विंडो वर तुम्हांला तुमच्या एलपीजी अकाऊंट सोबत बॅंक आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही याची माहिती विचारली जाईल.
- आता सिलेंडर बुकिंग हिस्ट्री, सबसिडी ट्रान्सफर याची माहिती पाहता येईल.
- तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे कळेल.
- 10- जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता.