प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-मा. बच्चनसिंह पोलीस अधिक्षक वाशिम,यांनी वाशिम जिल्हयातील वाढत्या गुन्हे गारी तसेच
अवैध धंदयावर आळा घालण्याकरीता दिनांक १६/११ /२१ ते २२/११ / २१ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशित केले.
विशेष मोहिमे दरम्यान वाशिम जिल्हयातील माहितगार गुन्हेगार,वारंवार गुन्हे करणारे. गुन्हेगार,हिस्ट्रीशिट वर असलेले गुन्हेगार चेक करण्याबाबत आदेशित केले.त्या अनुषंगाने दिनांक १६/११ /२१ ते २२/११/२१ या कालावधीत वाशिम जिल्हयातील १३पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष पथके तयार करुन, एकुण १०९ हिस्ट्रीशिटर,माहितगार गुन्हेगार १२०,
दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले १२० आरोपी चेक करण्यात आले.
