Post Views: 460
कापूसतळणी येथील शेवाणे परिवाराने ठेवला समाजापुढे आदर्श
अंजनगाव सुर्जी – प्रतिनिधी महेश बुंदे
मानवी मृत्यूनंतर समाजात सुरू असलेल्या परंपरा बाजूला ठेवून नवीन विचार कसा समाजासमोर प्रेरणादायी ठरेल या विचाराने कापूसतळणी येथील श्री. संत गाडगेबाबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने स्व. वामनराव बंडाजी शेवाणे यांचे निधनानंतर शुद्धपंगतीचा कार्यक्रम न करता रुपये ५१००० तसेच स्व. पंचफुलाबाई वामनराव शेवाणे यांच्या निधनानंतर शुद्ध पंगतीचा कार्यक्रम न करता रुपये ५१००० दान देण्याचा निर्णय घेऊन शेवाणे कुटुंबीयांनी शुद्धपंगतीची कार्यक्रम पत्रिका तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होते.
या पत्रिकेची प्रेरणा गावातीलच संदीप सत्यनारायणजी लोहिया यांनी घेऊन आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा मंदिराचा जीर्णोद्धार करिता मंदिर जीर्णोद्धार प्रमुख अरुण वामनराव शेवाणे यांची भेट घेऊन स्व. सत्यनारायणजी जगन्नाथ लोहिया यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रुपये ५१००० देण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने श्री संत गाडगेबाबा मंदिराचा जीर्णोद्धाराचे भूमिपूजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला च्या गजरेत भूमिपूजन करून गरीब व गरजूंना साड्या व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. भूमिपूजन श्री संत गाडगेबाबा अंतिम श्रद्धास्थान नागरवाडीचे अध्यक्ष श्री बापूसाहेब देशमुख, देणगीदार श्री. दयाराम वामनराव शेवाणे, देणगीदार संदीप सत्यनारायणजी लोहिया यांचे शुभ हस्ते व श्री गजानन देशमुख संचालक गाडगेबाबा अनाथ आश्रम दर्यापूर, सरपंच कु.अक्षता खडसे, डी आर राऊत विस्तार कृषी अधिकारी पं.स. अंजनगाव, श्री विजय कथलकर यशस्वी ग्राम विकास अधिकारी ग्रा.पं. कापूसतळणी, श्री प्रकाश महात्मे व्यवस्थापक गाडगे बाबा समाधी मंदिर अमरावती, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या गाडगेबाबा मंदिराच्या अपूर्ण बांधकाम जीर्णोद्धारा करिता शेवाणे कुटुंबीयांनी व लोहिया कुटुंबीयांनी जो निर्णय घेतला हा स्तुत्य उपक्रम असून समाजासमोर प्रेरणादायी ठरला. हाच संदेश गाडगेबाबांनी आयुष्यभर जनतेला आपल्या कीर्तनातून सांगितले आहे. आणि याच संदेशाला प्रेरित होऊन आज या ठिकाणी जीर्णोद्धार भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरोखर गाडगेबाबा शेवाणे व लोहिया परिवारांना समजले आहेत.
या पावन भूमीत मला येण्याचे भाग्य मिळाले. असे श्री बापूसाहेब देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे. सर्व पाहुण्यांचे शाल व फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सर्व पाहुण्यांचे मार्गदर्शन सुद्धा झाले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन-कीर्तन श्री बापूसाहेब देशमुख यांनी म्हणता म्हणता ब्लॅंकेट व साडींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर जीर्णोद्धार प्रमुख अरुण वामनराव शेवाणे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, या ठिकाणी गाडगेबाबांनी स्वतः परिसर स्वच्छ करून किर्तन केले होत ,म्हणून या ठिकाणी ४२ वर्षापूर्वी छोटेसे मंदिर बांधले होते. सन २०१३ मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराला लोकसहभागातून सुरुवात केली.
लोकसहभाग देणगी कमी झाल्यामुळे पूर्ण बांधकाम होऊ शकले नाही म्हणून मी माझ्या कुटुंबासह निर्णय घेऊन माझे वडिल व आई यांच्या निधनानंतर शुद्धपंगत न करता शुद्धपंगतीला येणारा खर्च मंदिराचा जीर्णोद्धारा साठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. तसेच गावातील संदीप भाऊ लोहिया यांनासुद्धा ५१००० रुपये देणगी मागितली त्यांनीसुद्धा होकार दिला. असे आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटले आहे. देणगीदातांचे, प्रमुख पाहुण्यांचे,व शांत चित्ताने ऐकून घेणाल्या गावकरी मंडळींचे तसेच भजनी मंडळींचे आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक, व आभार अरुण शेवाणे यांनी केले.