सर्व ग्रामपंचायतीत स्वच्छतेचे उपक्रम राबवुन शौचालय दिन व कौमी एकता सप्ताह साजरा करा- सीईओ सुनिल निकम

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

19 नोव्हेंबर: आज जागतिक शौचालय दिन

19 ते 25 नोव्हेंबर: कौमी एकता सप्ताह


वाशीम:-जिल्हयात शाश्वत स्वच्छतेचे महत्व वाढविण्यासाठी सर्व ग्रामपंचायती मध्ये दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवुन हा दिवस साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले आहे. तसेच दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान कौमी एकता सप्ताह साजरा करुन सर्वधर्म समभाव संदेश देण्याचे आवाहनही सीईओ निकम यांनी केले.

जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनच्या वतीने दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुध्दा शासन निर्देशानुसार सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार गावामधील प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांनी दिले आहेत. सध्या गावात हागणदारीमुक्त पडताळणी टप्पा 2 ची कामे प्रगतीपथावर आहेत, ती कामे यादिनानिमित्त पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गावातील सांडपाणी व घनकचरा तसेच प्लास्टिक व्यवस्थापनाची काने तसेच एक खडडा शौचालयाचे रुपांतर दुसऱ्या खडडयात करण्याचे कामे आणि सार्वजनिक शौचालयाची कामे या दिनानिमित्त करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राम स्तरावर अजुनही शौचालय उपलब्ध नसलेल्या लाभार्थीचे नावे आॅनलाईन करण्यासाठी आधारकार्डसह यादि पंचायत समितीला सादर करण्याचे निर्देशही सीईओ निकम यांनी दिले.

कौमी एकता सप्ताह:
दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान कौमी एकता सप्ताह साजरा करुन सर्वधर्म समभावाचा संदेश सर्व गावांमध्ये व शाळेमध्ये सकाळी रॅली काढुन व ईतर उपक्रम राबविण्याचे निर्देश सीईओ निकम यांनी दिले आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!