कसबा पेठ व चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध

भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या काळात कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!